Bag om सामान्य माणसाच्या कविता
About the Book: सामान्य माणसाने, सामान्य भाषेत लिहिलेल्या अशा या 'सामान्य माणसाच्या कविता!' हा कवितासंग्रह म्हणजे कवीच्या जीवनात घडलेल्या किंवा इतरांनी अनुभवलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दलच्या वाटलेल्या भावना. समाजात वेगाने बदलतो आहे आणि या सतत बदलणाऱ्या समाजात कवीच्या मनाची होणारी व्यथा म्हणजेच या कविता रुपात मांडलेल्या कथा ज्या कदाचित तुमच्याही कविता असतील आणि म्हणूनच ह्या कविता जरी कवीने लिहिलेल्या असल्या तरी त्यातल्या भावना आणि व्यथा आपल्या सगळ्यांच्या आहेत. ह्या कवितांमार्फत कळत नकळत काही गोष्टींच्या वर्मावर बोट ठेवले आहे आणि काही कविता या आपल्याला आपल्या नैतिक जबाबदारी बद्दल विचार करायला भाग पाडतात. लहान मुलांवर सगळेच संस्कार करतात, पण जे मोठे झालेत त्यांच्यावर नव्याने काही संस्कार व्हावेत म्हणून ह्या कविता आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे, सुख म्हणजे नक्की काय? पैसा म्हणजेच सर्वस्व का आणि खरे समाधान कशात आहे ते व्यक्त करणाऱ्या अशा या कविता! About the Author: अरुण भऊड हे बी. ई. (कॉम्प्युटर्स ) चे पदवी धर आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांना १७ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे. पटणी, टाटा कंसल्टंसी सर्विसेस, कॉग्निझंट, आर्क सोल्यूशन्स अशा आंतरराष्ट्रीय कंपन्यांत काम केल्यावर ते मॉर्निंगस्टार कंपनीत 'मॅनेजर' म्हणून कार्यरत होते. अभियांत्रिकी विद्यालयात ते गेस्ट लेक्चर देतात तसेच 'विवेकवादी विचारसरणी' या विषयावर शाळा, कॉलेज आणि कॉर्पोरेट कंपन्यांत मार्ग दर्शन देखील करतात. काव्यरचने व्यतिरिक्त त्यांना वाचन, फोटोग्राफी, क्रिकेट आणि पाककलेचीही आवड आहे.
Vis mere